
हे माहित असूनही प्रेम करत राहायचं तिलाजीवापाड जपत राहायचं
अपेक्षा न ठेवता निरागस मन ठेवायचं तिच्यावरच्या प्रेमासाठी तिच्या आठवणीत जळायचं
कितीही झुरल मन तरी अंतर ठेवायचं प्रेम म्हणजे काय तिला दाखवून द्यायचं
रात्र रात्र जागून अश्रुना वाट करूनद्यायचं तिला भेटतांनामात्र ओठांवर हसू ठेवायचं
फक्त तिच्यासाठीच जगण स्वतःलाही विसरून जायचं तिच्या प्रत्येक आठवणींना शब्दांच्यामाळेत गुंफायच
असंही असतं प्रेम तीजीवनात आल्यावर कळलं काय करू तिच्यामुळेच तर प्रेम काय असतं हृदयाला कळलं ..