सकाळी तीच स्वप्न बघत उठायचं ... उठल्या उठल्या मोबाईल हातात घ्यायचा... ... आजतरी तिचा मेसेज आलाय का.. नाही..

ब्रेक फास्ट करताना.. तिचाचविचार करायचा.... "लग्न झाल्यावर रोज सकाळी कांदेपोहेच घालेन खायला" हे हे... हे आठवून निमुटपणे चपाती घश्यात घालायची तिने "बी एफ झाला का रे?" अस नक्कीचविचारल असणार..

परत मोबाईल घ्यायचा .. मेसेज आलाय का ... नाही....

ऑफिस ला निघायच्या आधी फेसबुक उघडायच... काल रात्री तिला हाय केलेलं.... मीऑफलाईन गेल्यावर तिने रिप्लाय केला तर नसेल... नोटिफिकेशन बघायचं...मेसेज आलाय का.... नाही.....

ऑफिस ला निघायचं.... रस्त्यात कोणी सुंदर मुलगी दिसली..कितिलाच आठवायचं.. प्रत्तेक येणा-जाणाऱ्या कपल्स मध्ये स्वतःला आणि तिला बघायचं तेवढ्यात मोबाईल वायब्रेट होणार.... "ऑफिस लानिघालास का रे?...." मेसेज असेल तिचा... मोबाईल घ्यायचा...तिचाच मेसेज आलाय का? नाही.....

दुपारी... संध्याकाळी... असाचमोबाईल चेक करत बसायचं... फोन तर उचलत नाही ... निदान मेसेज तरी करेल... या खोट्या आशेवर पूर्ण दिवस मोबाईलशीचनात जोडायचं... एकच प्रश्न स्वतःला....तिचाचमेसेज आलाय का? एकच उत्तर स्वतःला... नाही.....

रात्री ऑफ लाईन जायची वेळ आली...कि न राहून तिला हाय करायचं... थोडा वेळ रिप्लाय चीवाट बघायची.... आणि निघून जायचं.. आजचा पूर्ण दिवस... आणि ब्रेक अप आधीचे दिवस आठवायचे... आणिहळू हळू डोळे ओले करायला सुरुवात करायची..... मग ओल्या डोळ्यानीच स्वतःच्या नशिबाला दोष द्यायचा.... आणिमनातच... उत्तराची अपेक्षा न करता..... स्वतःला २ देवाला२ आणि तिला २ प्रश्न करायचे.... सर्व झाल... कि एका हाताने उशी किती ओलीझाली याचा वेद घ्यायचा.. उशीउलटी करायची... आणिपरत तिलाचआठवून स्वप्न बघत झोपून जायचं.... कारण उद्या सकाळी तिचा मेसेज येणार आहे ना.....

असच करायचं रोज....

गूगल ऐडवर्ड्स

 
Top