परत पाउस पडत आहे

तोपावूस पाउस थांबला होता पण पानावरून टप टप चालू होती मीपण थांबलो होतो तुझ्यावरून नजर हटली नव्हती

स्वतःच्या पावलावर खिळलेले तुझे डोळे हळूच वर पहात होते पावूस थांबूच नव्हे असेच जणू सुचवित होते

मला तरी दुसरे काय हवे होते माझ्या छत्रीने काम साधले होते जीवनभर छत्र धरण्याचे मनोमन ठरवले होते

कावर्या बावर्या हरणीने विशाल नेत्र मोठे केले छत्री ऐवजीहातावरच माझ्या कोमल हात ठेवले होते

पावसाच्या थंडीतही हाताला चटकाबसला होता किती बरे वाटले होते इश्काचाच फटका होता

आज परत पाउस पडत आहे टप टप आवाजहि येत आहे पण खिडकी बंद करण्यामध्ये सौचे हात गुंतले आहेत..

Previous Post Next Post