आवडतं मला पावसात तुझ्यासंगे भिजायला छत्री घरीच ठेवून मनसोक्त हिंडायला
कधी पावसाकडे कधी तुझ्याकडे बघायलां मिठीत कधी तुला कधी घेतो गारव्याला

आवडतं मला पावसात तुझ्यासंगे भिजायला ं 1कच कणीस अधून-मधून खायला
ओठांवर चिकटलेले ते कणीस पुसायला मी पुसतांना तुझं लाजणं बघायला

आवडतं मला पावसात तुझ्यासंगे भिजायला तुझ्या डोळ्यात डोकावून माझं प्रेम पहायला
आसुसलेल्या ओठांवरचे पाणी अलगद टिपायला झोकून तू देता घट्ट मिठीत घ्यायला ....

गूगल ऐडवर्ड्स

 
Top