कोणासाठी जगू नये.

Photo: कळत नाहि
आज तुझा माझ्या स्वप्नांत असलेला वावर
उद्या असेल कि नाहि
आज तुझ्या चेहर्यावर असलेल हसु
मला परत दिसेल कि नाहि
या वाटेवर चुकामुक होऊन पुन्हा तु भेटशील कि नाहि
अन पुन्हा जर भेटलीसच तर ओळख दाखवशील किनाहि
माझ्या हाकेला साद तु देशील कि नाहि
माझ्या कवितेला दाद देशील कि नाहि
ते पहिल्यासारखच हसुन बोलशील कि नाहि
या भ्रामक फालतु कल्पना
तुझ्या सोबतीचा मला विश्वास आहे
तु डोळ्यांत मला ते दिसत
तुझ्या मनातहि खास तेच आहे
-manoj...♥असे वाटते आजकाल, कोणासाठी जगू नये
आपण असतो आपले कोणी आपला म्हणू नये
असे वाटते आजकाल, कोणासाठी जगू नये
कळीचे होते गुलाब ,गुलाब कोणी मागू नये
ठेवा आठवणीच्या पाकळ्या,काटे
कोणी टोचू नये
असे वाटते आजकाल ,कोणासाठी जगू नये
कल्पनेचा खेळ सारा,काव्य कोणी मागू नये
गोंदा मनी अक्षरे सारे,कागद कोणी फाडू
नये

असे वाटते आजकाल, कोणासाठी जगू नये
जन्म-मृत्यूचा हा खेळ,जन्म कोणी मागू नये
जिंकून घ्या विश्व
सारे,जीवनरेषा कोणी खोडू नये
असे वाटते आजकाल, कोणासाठी जगू नये
मी तिचा ती माझी,तीचासाठी कोणी जगू
नये
वेगळे तिचे जग सारे,प्रेमामध्ये कोणी पडू
नये
असे वाटते आजकाल, कोणासाठी जगू नये
आपण असतो आपले, कोणी आपला म्हणू नये
असे वाटते आजकाल, कोणासाठी जगू नये
Share on Google Plus

About Hanumant Nalwade