तू माझ्यावर प्रेम करतेस का...?? जसा मी मरतो तुझ्यावर तू देखील मरतेस का...??
 तुला एकदा विचारलं होत...
  तू माझ्यासाठी कधी झुरतेस का...??
 जसा मी नेहमी तुझी काळजी करतो...
 तू देखील करतेस का...??
 
 तुला एकदा विचारलं होत...
  आकाशातील तारे तुटताना काही मागतेस का...??
 मी नेहमी तुझ्यासाठीच मागतो...
 तु पण फक्त माझ्यासाठीच मागतेस का...??
 
 तुला एकदा विचारलं होत... मित्रांच्या गर्दीत असूनसुद्धा माझ्या विचारात हरवतेस का...?? मी जसा तुझी वाट धरून चाल्लोय... तूदेखील चालतेस का...??
 
तुला एकदा विचारलं होत...साथ माझी देशील का...?? जशी फुलाला पाकळी... तशी माझी बनून राहशील का...??
 
 तुला एकदा विचारलं होत... अशीच गट्ट मिठीत राहशील का...?? मी जसा तुझ्या हृदयाच्या स्पंदनात माझ नाव ऐकतो.. तूदेखील तुझ नाव ऐकतेस का...??
  
 येशील वेडे पुन्हा माझ्याकडेच...नाही का...!!! 

 
