आठव जरा ते क्षण ..!!

आज डोळ्यांत पाणी देऊन तू गेलीस
जे कधी स्वप्न मी पाहायचो तू माझ्या मिठीतच रहावीस
आयुष्यभर सोबत राहण्याचे ते स्वप्न आज स्वप्नंच बनून राहिले ..

आठव जरा ते क्षण..!!

तू आणि मी सोबत एकटेच बसायचो
तू माझ्या डोळ्यांत आणि मी तुझ्या डोळ्यांत रहायचो
तुझ्या डोळ्यांत पाहताना मी हरवून जायचो
तू तशीच डोळ्यांनीच बोलायची
मला म्हणायची तू मला सोडून कधीच जाणार तर नाहीस ना
मी तर वेडाच होतो मला प्रेम तूच शिकवलेस
हसणे काय असता रडण ए काय असता हे तूच जाणवून मज दिलेस
मी हि हसत तुला म्हणायचो वेडे तू तर माझा प्राण आहेस
तुला सोडून कसे मी जाणार

आठव जरा ते क्षण ..!!

भर पावसात मी तुझी वाट पाहत ओलेचिंब भिजायचो
तू येण्याच्या वाटेवर नझर ठेवून कासावीस मी व्हायचो
मग तुझी चाहूल मज व्हायची
तू यायचीस मला भेटायला एकच छत्री घेऊन
माझ्या कडे पाहून तू मला रागवायचीस
का रे असा भिजतोस मी तर तुझीच आहे ना मग का तुला असा दोषी ठरवतोस
मला नेहमीच एक भीती वाटायचीतू मला सोडून तर जाणार नाहीस ना
मग तू मला घट्ट मिठी मारायची
खरचं माझ्या सोन्या तुला कधीच सोडणार नाही ह्याची खात्री मज द्यायची
मग मला हि तेव्हा जिंकल्या सारखे वाटायचे आयुष्यभर हरणारा मी एक विश्वाच मी जिंकायचो

आठव जरा ते क्षण ..!!

तू आणि मी भेटायला त्या बागेत बसायचो
मी रागावलो तर हातात हाथ माझा घ्यायचीस
बघ ना सोन्या एकदा माझ्या कडे म्हणत मला जवळ तू करायचीस
मी हि तेव्हा सगळे विसरून तुला मिठीत घ्यायचो
मग एकदा बाबा तुझे मागून येताना पाहून तू खूप घाबरायची
तुझ्य्यासाठी मग माझीही तेवढीच धावपळ व्हायची
मी लपायचो आणि तू मग तेव्हा हसायची

आठव जरा ते क्षण..!!

तूच सांगायची ना तू मित्र संगत सोडून दे
पण मीच वेडा मला मैत्री खूप आवडायची आयष्यभर हरलो मैत्रीत तरी त्यांनाच माझे जिवलगमित्रमी म्हणायचो
आज हि वेळ आहे तीच
जिथे मी एकटा पडलो

आठव जरा ते क्षण..!!

तू म्हणालीस मी तुझी होऊ शकत नाही
माझ्या काळजाला तूच तेव्हा घायाळकरत म्हणालीस
मी तर तुला प्रेमच दिले ना मग का माझ्या प्रेमाचे बक्षीस तू ऐसे दिलेस

आठव जरा ते क्षण..!!माझ्या डोळ्यातून पडणारे अश्रू
आज तसेच आहेत
पण ..??
तू त्यांना न पहिले
तुझी माझी भेट त्या जखमांना चिघळत करून ठेवलेस ...

गूगल ऐडवर्ड्स

 
Top