काही कळलच नाही

कधी इतकं प्रेम झालं...काही कळलच नाही,
कधी इतकं वेड लावलस...काही कळलच नाही.
पहिल्यांदा कधी आवडलीसहे खरचं नाही आठवत,
पण आठवण काढल्याशिवाय आता खरचं नाही राहवत.
चेहरा आठवतो ना तेव्हा काय सांगू कसं कसं होतं?...
आसुसलेल्या आभाळाकडे पाखराने उडावं ना तसं होतं,
उन्हामधुन दमुन सावलीतयावंना तसं होतं.
तुझं हसनं म्हणजे नक्की सांगू तरी कसे?
सुकलेल्या जमिनीवर सरीँनी कोसळावे ना तसे.
तुझं भेटनं म्हणजे नक्की सांगू तरी कसे?
बुडत्या सुर्याने समुद्राच्या मिठीत जावे ना तसे.
पण सांग ना इतकं कसं कुणी सुंदर असू शकतं?
बहुतेक हे तुझं गेल्या जन्मीचं केलेलं पुण्यअसु शकतं.
पाहु नको आरशात...बिचाऱ्य ा त्या आरश
तु जाशील गं पाहुन मागे त्याचं काय
होतं हा तरी विचार कर.
अशीच नेहमी वाहत रहा,
मला डोळे भरून पाहत रहा,
पार भिजवुन टाक मला तुझ्या प्रेमात..
काही कळलच नाही काही कळलच नाही Reviewed by Hanumant Nalwade on December 23, 2012 Rating: 5
Powered by Blogger.