तुझीच आठवण.

दिवस मावळला रात्र उगवली,
तरीही तुला काही माझी आठवण आली नाही,

तुझीच आठवण का येते सारखी हेच काही केल्या समजत नाही.


आता मला उचकी येणंही बंद झाली आहे,


कारण तू मला आठवायचं सोडून दिलं आहे,

तुझ्या उचक्या थांबतात कि नाही कुणास ठाऊक,

कारण दिवस रात्र फक्त तुझीच आठवण मी काढत आहे.

मलाही तुझ्या नावाची उचकी यावी असं खूप वाटतय,


आता तरी माझी आठवण काढ असं माझ मन तुला सांगतय
Share on Google Plus

About Hanumant Nalwade