चंद्र तुझा.


आजही त्या चंद्रात चेहरा तुझा दिसतो
डोळ्यांच्या पापण्यात ओलावा दाटतो

चालताना तु सोबत असल्याचा भास होतो
वळून पहिल्यावर मात्र मी एकटाच असतो
हा एकटेपणा खरंच काळीज कापतो
जणू हृदयाला रक्ताचा पाझर फुटतो

नदीचा तो हिरवा घाट आजही तसाच भासतो
आजही तो तेथे बसण्यासाठी मोहात टाकतो
तुझ्या आठवणींना तो आजही उजाळा देतो
तुझ्याविना मात्र तो खरंच निरागस वाटतो

भूतकाळाच्या आरशात आजही तुला पाहतो
तुझी प्रतिमा दिसताच मी सैर भैर  होतो
असा कोणता आघात त्यावरी होतो की...
तुटलेला त्याचा प्रत्येक कण मनाला टोचतो

न राहुनी  ओलावा पुसून  डोळे मिटतो
उघडताक्षणीच तो चंद्र पुन्हा तसाच दिसतो
आठवणींचा झरा पुन्हा वाहू लागतो
दुःखाच्या सागरातच तो विलीन होतो...
Previous Post Next Post