बिकट वाट.


दुःख  आणि एकटेपणा हाच
जणू मार्ग आहे प्रवासाचा....
काळोख माजला आहे वाटेवरी
प्रकाश हि नाही चंद्राचा....

झाडही नाही सापडत
थोड्याश्या आधारासाठी....
विहीरही नाही दिसत
पाण्याच्या एका थेंबासाठी....

काटे आणि खड्डेच
आहेत ठेचकळण्यासाठी....
एक दगडही नाही दोन घटका बसण्यासाठी....

रात्र रात्र चालतो आहे फक्त एका उजेडासाठी....
मात्र साधी ठिणगीही नाही वाट दिसण्यासाठी....

उघडे डोळेही बंद वाटत आहेत मला...
निराशेच्या वाटेवर आशेचा धूरच दिसत आहे मला...

रक्ताने माखलेले पायही उठत नाहीत आता...
घश्याची कोरडही मिटत नाही आता...

काहीच नाही उरले आता, त्राण ही नाही शरीरात...
फक्त आहे जिद्ध जीला घेवून चालतो आहे मनात .....
Previous Post Next Post