हळू हळू ही हवा बोलत आहे
कानामधी कुजबुज करत आहे
हळू हळू हा ऋतू बदलत आहे
माझ्यासंगे हा ऋतू डोलत आहे
कधी काळी पाहिलेले ते स्वप्न
आज जागे होते आहे
धुक्यातला तो धूसर चेहरा
थोडा थोडा दिसतो आहे
पानावरचे ते दव मोत्यापरी चमकत आहे
आनंदाचे रंग घेवूनी आज इंद्रधनू आले आहे
प्रेमाचा हा गार वारा मला थंड करतो आहे
मानाचा पक्षी आज आकाशी उंच भरारी घेतो आहे
तुझ्या प्रीतीच्या पावसात चिंब भिजते आहे
कसं रे सांगू गड्या तुजला तुझ्याच मी प्रेमात आहे
हळू हळू ही हवा बोलत आहे कानामधी कुजबुज करत आहे
हळू हळू हा ऋतू बदलत आहे माझ्यासंगे हा ऋतू डोलत आहे ....