Sunday, July 15, 2012

आठवण तिची...

आज तिची आठवण येतेय इतके मात्र आहे खर ....
लोक विचारतायत तुला काय आहे झाल?...
... मी म्हणतो काही नाही सार काही आहे बर...

लोकांना असतात अनेक छंद किंवा व्यसन...
माझ्यात मात्र ती अन तिच्या आठवणीच प्रत्येक क्षण...

मिटलेल्या डोळ्यात आहे ती... सुचलेल्या गाण्यात आहे ती...
गजबजलेल्या गर्दित तर कधी एकांताच्या शांततेत आहे ती...
माझ्या प्रत्येक शब्दात अन् शब्दाच्या ओळीत तीच आहे ...

तसं वेगळ काही नाही... दाहिदिशांना तीच इतकं मात्र आहे खरं ...
लोक विचारतायत तुला काय आहे झाल?...
... मी म्हणतो काही नाही सार काही आहे बर....

लुकलुकत्या ताऱ्यात आहे ती... थंड गार वाऱ्यात आहे ती...
मदिरेच्या रंगात तर कधी अत्तराच्या गंधात आहे ती...
सोनपिवळ्या रानात अन् रानातल्या पानांत तीच आहे

तसं वेगळ काही नाही... आज प्रत्येक आठवण तिचीच इतके मात्र खर....
लोक विचारतायत तुला काय आहे झाल?...
... मी म्हणतो काही नाही सार काही आहे बर....

Reactions: