विचारांच्या गर्दीत हरवले मी स्वत: स्वत:ला... नकळत्या दिशेने ...
हरवलेला पुन्हा सापडेन मी स्वत: स्वत:ला... नव्याकोर्या आशेने...
नकळत सापडलेली, समोर दिसली ती... वाट होतो चालत...
माझे ध्येय, माझे लक्ष्य नयनातून चालले नदीकडे धावत...
इतक्यात कोणीतरी धरला माझा हात हातात
नेले मला त्या प्रवाहाकडे खेचत ओढत ओढत...
बोलला बघ.. बघ तुझेच प्रतिबिंब या प्रवाहात...
थरकाप उडाला माझा...पाहून माझेच ओंगळ रूप ...
लचके तोडणारे नव्हती श्वान, गिधाडे...माझीच होती माणसे ती ...
अर्जुनासारखा मी सुद्धा हतबल होतो झालो... खोलवर आतून जखमी...
आता सारे काही द्यावे सोडून अन् याच प्रवाहात उडी मारावी...
अचानक कुठूनतरी आवाज आला...
अचानक कुठूनतरी आवाज आला... आलास एकटा जाशील एकटा...
कशाला फुकाची फिकीर जगाची... झुंज स्वत:च स्वत:शी एकटा...
देवाने तूला माणूस केला ते का असे हतबल व्हायला?
काही क्षण स्तब्ध झालो...
लावला हिशोब कोण होतो, काय झालो याचा...
काय कमावले, काय गमावले या सार्याचा...
पाहिले वळून मागे आता...आता मात्र तीच वाट होती हविहवीशी
प्रवास तसाच एकटयाचाच... पण पावलापावली नविनविशी...
देईन झुंज...भिडेन पुन्हा जाउन त्या गगनाशी...
नवीन आशा आणी नवी क्षितिजे गाठण्या स्वप्नाची...