आज ती समोर असुनही ती नाही माझ्या बरोबर...
तीच प्रेम आहे का ?? आहे का माझ्यावर खरोखर?...
तीच मन जिंकण्याचा मी खुप प्रयत्न केलाय...
आजचा प्रत्येक क्षणसुद्धा तिचाच होउन गेलाय...
तिची नजर मात्र शोधतेय कोणा दुरवर...
आज ती समोर असुनही ती नाही माझ्या बरोबर...
तसं ती मला नेहमी सांगते, मी तिला आवडतो...
तिच्या अश्या सांगण्याने मी मलाच सापडतो...
तिची अदा, शब्द तिचे रुजतात मनात खोलवर...
तरीहि समोर असुनही ती नाही माझ्या बरोबर...
तिची साथ लाभली आज, हेच काय कमी आहे ?...
नसेन मी तिचा जरी, तिचे असणे काय कमी आहे?...
विचारांच्या अशा गर्दीमध्ये येते तिच्या निरोपाची वेळ...
सुर्याला तेव्हा गिळतो सागर, सुन्न विछिन कातरवेळ...
निरोपाचे क्षण हे हळवे... हसणे खोटे गालावर...
सुखदुखाचा नयनी भरतो गहिरा खोल सरोवर...
आता ती नसली तरीही...तिच्या आठवणी आहेत बरोबर...