माझिया प्रियाला प्रीत कळेना .....!
घेउन येशील कोवळे रुतू सुगंधी सात हे
नविन भाषा कोणती नजर काही बोलती
सार्या सरी या माझ्याच पाशी चिंब तू होई ना
माझिया प्रियाला प्रीत कळेना .....!
नविन तारे, चंद्र नवा हा, नविन आहे, रुतू हवासा
अनोळखी हा बहार घेउन पुन्हा पुन्हा भेट ना
माझिया प्रियाला प्रीत कळेना.....!

तुझी नी माझी भेट ती क्षणो क्षणी का आठवे
आधी कधी ना वाटले काही तरी होते नवे
सांगू कश्या मी तुला सख्या रे माझ्या या भावना
माझिया प्रियाला प्रीत कळेना .....!
जागुन तारे मोजतो आहे तुझ्यात मी ही रुजतो आहे
कधी तुला गं कळेल सारे खेळ आहे जुना