हो, येते ना तुझी आठवण

काय म्हणालास? आठवण?

हो, येते ना तुझी आठवण


कधी सायंकाळचा गारवा तर

कधी सकाळचं कोवळ ऊन घेऊन


कधी ओठातले शब्द तर

कधी निशब्द झालेले मौन घेऊन



कधी रेटाळलेला दिवस तर

कधी नकळत सरलेला क्षण घेऊन


कधी डोक्यातला विचार तर

कधी झोपेतलं सुंदर स्वप्न घेऊन


कधी ह्रदयातलं स्पंदन तर

कधी वाट बघणारं मन घेऊन


हो, येते ना तुझी आठवण