तू समजुन का घेत नाही.

तू समजुन का घेत नाही..........

कसं गं तुला काही समजत नाही
... साधी,सरळ आणी सोपी गोष्ट आहे,
तुझ्याशिवाय मला राहवत नाही


इतक्या सहजासहजी फोन ठेउ का विचारतेस,
भावना का माझ्या तुला जाणवत नाही
साधी,सरळ आणी सोपी गोष्ट आहे,
तुझ्याशिवाय मला करमत नाही

तुज़शी बोलो नहीं की जगही खायला उठतं,
कशातच लक्ष माझं लागत नाही
एवढही तुला कसं कळत नाही,
तुझ्याशिवाय माझ्या जगण्यालाच अर्थ नाही

कधी कधी असं वाटतं,
तू फक्त दाखवतेस की तुला समजत नाही
माझ्या भावना तू चांगल्या जाणतेस,
पण मुद्दामच तू मला भेटत नाही

न भेटण्याने आता काही होणार नाही,
मी तुझ्याशिवाय क्षणभरही जगु शकणार नाही 

सोना तू समजुन का घेत नाही..........
 
तू समजुन का घेत नाही. तू समजुन का घेत नाही. Reviewed by Hanumant Nalwade on May 25, 2012 Rating: 5
Powered by Blogger.