किती साधी ग तू


किती साधी ग तू,
ना सजनं ना मुरडनं,
ना लटके झगडणं,
किती सच्ची ग तू..
जे काही असेल ते आतून सजलेलं,
... सकाळचं ऊन जसं पावसात भिजलेलं..
किती मन लाऊन जगणारी तू,
किती जीव लाऊन जगणारी तू,,
तुझे ओझरते देखावे जगणं शिकवून जाणारे..
तुझे हसते नजारे हसणं शिकवून जाणारे...
किती वार्यासारखी तू,
किती पाण्यासारखी तू,
वाहत जाणारी .. आपल्याच कलेनी,
वाहावत नेणारी .. स्वैर ओढ्यासारखी..
एवढा का हेवा वाटावा,
तुझ्या जगण्याचा..
तुझं जग बघण्याचा..
एकदा तुझ्या डोळ्यांनी ही दुनिया बघावी म्हणतो..
ती सुंदर भासेल.. नव्हे असेलच!
तुझ्या हातात हात घेउन डोळ्यात हसावं म्हणतो..,
पाणी गालांवर असेल.. किंवा रुसेलच...
तुझ्या असण्याचा आनंदोस्तव जगायचाय..
तुझ्या हसण्याने, तुझ्या सोबत असण्याने......
Share on Google Plus

About Hanumant Nalwade