ती चालली होती, एकटीच एकटिच्या वाटेने.....
कुणाचीतरी सोबत मिळेल या वेडया आशेने......

तसा डोक्यावरचा सुर्य होताच तिच्या साथीला.....
जणु तो साथ देत होता तिच्या संथ गतीला.......

तिला भान न होते तिच्याही अस्तित्वाचे.........
चटकेही लागत नव्हते पाया खालच्या विस्तवाचे......

अचानक डोक्यावरचा सुर्य ढगाआड जाउ लागला.....
भर दिवसा हवेत मंद वारा वाहु लागला.....

तिच्या शांत चेहरयावर हसु उमटले......
गुढ प्रकृतीचे जणु फक्त तिलाच उमगले......

आतुर होऊन ती ढगाकडे पाहु लागली.......
पावसाच्या नुसत्या कल्पनेने ती प्रफ़ुल्लीत होऊ लागली.....

तिला वाटल पावसाच्या आगणित सरी तिच्यावर कोसळणार.....
अन.. मतीचा सुगंध तिच्या श्वासात मिसळनार......

पन....तो मात्र तिला नुसतीच आशा दाखऊन परतला.....
ढगाआड लपलेला सुर्य गालतल्या गालत हसला......

डोळयातुन तिच्या पाण्याचे अनेक थेंब ओघळले.......
त्या थेंबा मुळे जनु सारे आसमंत उजळले....

ती शुन्य नजरेने तिच्या वाटेकडे पाहु लागली.......
थकलेली पाऊले पुन्हा ऊचलु लागली.... अन...ति पुन्हा एकटिच चालु लागली........ !!!!!

गूगल ऐडवर्ड्स

 
Top