आयुष्य खूप सुंदर आहे, सोबत कुणी नसलं तरी,
एकट्यानेच ते फुलवत रहा, वादळात सगळं वाहून गेल,
म्हणुन रडत बसू नका, वेगळ अस काही, माझ्यात खास नाही असं म्हणून उदास होऊ नका
मृगाकडे कस्तुरी आहे, फुलात गंध आहे,
सागराकडे अथांगता आहे, माझ्याकडे काय आहे, असं म्हणून रडू नका,
अंधाराला जाळणरा एक सूर्य तुमच्यातही लपला आहे.
आव्हाहन करा त्या सूर्याला!!!!! मग उगवेल तो तुमच्या आयुष्यात नवीन क्षितिज घेऊन.
अंधारामय रात्र संपवून सोनेरी किरणांनी सजून मग रोजच उगवेल एक नवी सकाळ,
उत्साह ध्येयाने भारुन म्हणून म्हणते......... आयुष्य खूप सुंदर आहे,

गूगल ऐडवर्ड्स

 
Top