मैत्री कधी ठरवून होत नाही.

एक सांगू का... मैत्री कधी ठरवून होत नाही.
आपण आपल्या वाटेवरुन चालत असतो
आपल्याबरोबर तसे अनेक वाटसरु असतात
रस्ते फुटत असतात
एकमेकात येऊन रस्ते मिसळत असतात
आपल्या नकळ्त कुणाची तरी वाट
आपल्या वाटेला येऊन मिळ्ते
आणि नकळत आपण एकाच
वाटेवरुन समांतर चालू लागतो
नंतर जवळ येतो
एकमेकाला आधार देतो, सोबत करतो
एकमेकांची दु:खे वाटून घेतो
आनंदाचे क्षण साजरे करतो
मैत्री अशी होते
काय जादू असते मैत्रीत!
मैत्री शिकवते जगण्याचा खरा अर्थ
मैत्री बदलून टाकते आयुष्याचे सारे संदर्भ
मैत्री देते आपुलकी, प्रेम अन विश्वास
मैत्री भारुन टाकते आपला श्वास अन श्वास
कधी कधी वाटतं
समुद्राच्या काठावर शिंपल्यांची रास पडलेली असावी
आपण भान विसरुन लहान मुलासारखं
त्यात खेळ्त असावं
शिंपलेच शिंपले...
विविध रंगाचे, आकारांचे, प्रकारचे...
सहजपणे त्यातला एखादा शिंपला उचलून घ्यावा
अलगद उघडावा
अन त्यात मोती सापडावा
खर्रा खुर्रा, तुझ्यासारखा
खरं सांगू का!
मोतीसुदधा लाभावा लागतो
मैत्री कधी ठरवून होत नाही. मैत्री कधी ठरवून होत नाही. Reviewed by Hanumant Nalwade on February 28, 2011 Rating: 5
Powered by Blogger.