
वेलकम जिंदगी हा चित्रपट गडद कॉमेडी प्रकारात मोडणारा चित्रपट आहे. यात केंन्द्रस्थानी आहेत दोघं. `वेलकम जिंदगी' या सिनेमातूनस्वप्नील जोशी आणि अभिनेत्री अमृता खानविलकर पहिल्यांदाच एकत्र येताहेत. एक मुलगी जिला जगण्यात स्वारस्यच उरलेलं नाही आणि एक मुलगा, जो तिच्या लेखी जीवनाचा अर्थ बनून जाईल.
वेलकम जिंदगी या सिनेमाची निर्मिती अजित साटम, संजय अहलुवालिया, बिभास छाया यांनी केली असून या सिनेमाचे दिग्दर्शन ऊमेश घाडगे यांनी केले आहे. मराठी रसिकांचा लाडका अभिनेता स्वप्नील जोशी या सिनेमाच्या माध्यमातून पहिल्यांदाच सुप्रसिद्ध अभिनेत्री अमृता खानविलकर हिच्यासोबत रुपेरी पडद्यावर दिसणार असून त्यांची ही धमाल जोडी रसिकांचे धमाकेदार मनोरंजन करण्यासाठी येत आहेत.