तु हसत राहिलीस अन मी बघत राहिलो

तु हसत राहिलीस अन मी बघत राहिलो.. तु बोलत राहिलीस अन मी ऐकत राहिलो..

तु रोज स्वप्नांत दिसत राहिलीस..  अन मी श्वास घेत राहिलो..
लोक म्हणायचे तेवढंच, की जगतोय.. बाकी मी तर क्षणोक्षणी मरतच राहिलो..

तुला बनवून रोशनाई मी आतल्या आत जळत राहिलो..

आठवणींना सोबत घेऊन तुझ्या मी एकटाच जगत राहिलो..

कुठल्यातरी वळणावर सापडेल विसावा.. बस या आशेनेच मी ह्या काटेरी वाटेवर अनवाणीफिरत राहिलो...
पण आज मागे वळून बघतांना कळतंय... तु आणि जग खूप पुढे निघून गेलेत..

अन मी वेडा बस्स कविताच करत राहिलो...
तु हसत राहिलीस अन मी बघत राहिलो तु हसत राहिलीस अन मी बघत राहिलो Reviewed by Hanumant Nalwade on January 24, 2015 Rating: 5
Powered by Blogger.