आवडते मला

तिचे ओळखीचे असूनही अनोळखी असणे...आवडते मला, I Love U.
दोन क्षण तिच्यासभोवती असणंही... आवडते मला, I Love U.
ऱोज बहाणे करुन तिच्याकडे जाणे... आवडते मला, I Love U.
तिने माझ्याकडे एक कटाक्ष टाकणे.. आवडते मला, I Love U.
कधीही डोळ्यात डोळे घालून विचारले, तर हो म्हणेल ती,
पण तिचे डोळे झुकवून “नाही” म्हणणे...आवडते मला, I Love U.
ती आहेच माझ्यासाठी खास, तिने मला काहीही म्हणावे,
मजनू, पागल किंवा वेडा... ते आवडते मला! I Love U.
तिला लोक कमळाचे फ़ुल म्हणतात,ती नुसतीच हसते,
लोकांचे मला भ्रमर म्हणणे... आवडते मला! I Love U.
कुणास ठावूक तिचे माझे काय नाते आहे?
माझ्या स्वप्नात तिचे येणे... आवडते मला!.. I Love U.
Share on Google Plus

About Hanumant Nalwade