आपल्या काहीच नसावे

कुणाची अशीही सोबत असू नये की प्रत्येक स्पंदनात ती जाणवावी ती साथ गमवण्याच्या केवळ भीतीने डोळ्यात खळकन अक्ष्रू जमावी.कुणाला इतकाही माझा म्हणू नये की त्याचे 'मी पण' आपण विसरुन जावे त्या संभ्रमातून त्याने आपल्याला ठेच देवून जागे करावे.पण,पण कुणाच्या इतक्याही दूर जावू नये की आपल्या सावली शिवाय सोबत काहीच नसाव कुणाला इतकाही वेळ देवू नये की आपल्या क्षणाक्षणावर त्याचा अधिकार व्हावा एक दिवस आरशासमोर आपणास आपलाच चेहरा परका व्हावा,कुणाची इतकीही ओढ नसावी की
पदोपदी आपण त्याचीच वाट बघावी त्याची वाट बघता बघता आपलीच वाट दिशाहीन व्हावी.
कुणाच्या इतक्याही जवळ जावू नये की आपल्याला त्याची सवय व्हावी तडकलेच जर ह्र्दय कधी जोडतांना असह्य यातना व्हावी.डायरीत कुणाचे नाव इतकेही येवू नये की पानांना ते नाव जड व्हावे एक दिवस अचानक त्या नावाचे डायरीत येणे बंद व्हावे.स्वप्नात कुणाला असंही बघु नये की आधाराला त्याचे हात असावे तुटलेच जर स्वप्न अचानक हातात आपल्या काहीच नसावे।
Share on Google Plus

About Hanumant Nalwade