दगडालाच देव मानले

माणसं ओळखायला, खरं तर माझंच चुकले...
आभासाच्या दुनियेत, दगडालाच देव मानले...

स्वार्थी न् निष्ठूर मनाला, माझं अबोल मन दिले...
अनामिक असूनही तुला, निस्वार्थ आपले मी केले..

तु भावनांचा खेळ केला, मी निमुटपणे सहन केले...
प्रेमाच्या नावाखाली तु, मनाला चितेवरी जाळले...

आनंद झाला असेल तुला, खोटी स्वप्न दाखवताना....


खळखळून हसत असशील, माझी तिरडी सजवताना...

तुझ्याकडे माणूसकी नव्हती, हे ओळखू शकलो नाही मी...
दगडाचे असं तुझं मन निर्जीव, कधी जाणलेच नाही इथे मी...

दोष तुझा नाही काही तुला, ओळखायला मीच चुकलो...
अनामिक पाऊलवाटेवरी, नाहक असा चालत गेलो...

तिरडी माझी सजली आहे, एखादा ओळख दाखवून जा...
मरणाकडे झेपावत असताना, माझ्या मढ्याला हसून जा...
Previous Post Next Post