क्षणभर डोळे बंद करून विचार करावा...तुम्हाला तुमचं उत्तरं मिळेल...
आयुष्यात आपल्याला नक्की कुठली व्यक्ती आवडते हे ठरवायचं असेल ना तर क्षणभर डोळे बंद करून विचार करावा...
तुम्हाला तुमचं उत्तरं मिळेल...कारण उघडे डोळे ना धोका देतात...
उघड्या डोळ्यांना फक्त वरवरच दिसतं...तर बंद डोळ्यांना आतलं दिसतं...
उघड्या डोळ्यांना फक्त वरवरच दिसतं...तर बंद डोळ्यांना आतलं दिसतं...
उघड्या डोळ्यांना फक्त चेहरे दिसतात.. बंद डोळ्यांना कोणाचा चेहरा दिसत नाही...
बंद डोळ्यांना फक्त खूप गरज असतांना साथ देणाऱ्या त्या हाथांचा स्पर्शच कळतो...
उघड्या डोळ्यांना फक्त भौतिक सौंदर्य आणि भौतिक सुखं दिसतं...
बंद डोळ्यांना भावनिक साथ दिसते... अन आयुष्याच्या प्रवासात ही साथ जास्त महत्वाची असते...
उघडे डोळे फक्त बघतात.. म्हणून ते नेहमी भ्रमात पडतात..
बंद डोळे 'अनुभवतात'... म्हणून ते नेहमी खरे ठरतात.
उघडे डोळे फक्त बघतात.. म्हणून ते नेहमी भ्रमात पडतात..
बंद डोळे 'अनुभवतात'... म्हणून ते नेहमी खरे ठरतात.