Friday, November 22, 2013

कुणासोबत करू नकोस..

 
आज तू नसताना  सतत तुझी आठवण येते
तुझी आठवण मला  भूतकाळात घेऊन जाते
तिथे मी होतो  तुही होतीस माझ्यासह
कुणीच नव्हते दुसरे  आपण आणि आपलेच जग
किती रमलो होतो आपण  विसरून साऱ्या जगाला
किती प्यायलो होतो  आकंठ त्या प्रेमाला
पाहता पाहता दिवस जात आणि येत होते
काय माहित काळाच्या पडद्यामागे काय होते
अचानक आले कुठून वादळ एक जोराचे
वाहून गेले आपले घरटे सुंदर प्रेमाचे
आता वास्तव हेच फक्त उरले आहे


 प्रेमाचे तर जाऊद्या दुखही मेले आहे
आधी अश्रू होते माझी साथ द्यायला
आता तेही नाहीत रडून हलके करायला
तुझे कसे चाललेय तू खुश आहेस ना??
मला अशी विसरून तुझी तरी आहेस ना??
तू आता खुश राहा माझा विचार करू नकोस
गेलेल्या दिवसांची आठवण सुद्धा काढू नकोस
एकच मागणे आहे माझे शेवटचे ते मोडू नकोस
जे माझ्यासोबत केलेस ते कुणासोबत करू नकोस..

Reactions: