
असं घडूच शकत नाही डोळे मिटल्यावरही तुला पहावंस वाटतं
उगीच असं घडत नाही तुझ्यात काहीतरी खास असल्याशिवाय
असं घडूच शकत नाही तुला स्वप्नात घेतल्याशिवाय
मनही निजू शकत नाही तुझ्यात काहीतरी खास असल्याशिवाय
असं घडूच शकत नाही एक क्षणही तुझ्या आठवणीशिवाय
माझा कधीच जात नाही तुझ्यात काहीतरी खास असल्याशिवाय
असं घडूच शकत नाही फक्त तूच माझं विश्व झाली आहेस
इतकं वेड मला लागू शकत नाही तुझ्यात काहीतरी खास असल्याशिवाय
असं घडूच शकत नाही उगीच माझ्या रोमा रोमात तुझी प्रीत फुलली नाही .