खरंच का मला विसरलीस तु

बदललोय मी आता असं म्हणतात सारे. विसरलोय तुला मी असंही म्हणतात सारे.

पण श्वासागणिक तुझं नाव घेण्याची सवय अजूनही आहे .

बदललाय मी माझा रस्ता शोधल्यात आता नव्या वाटा. पण गेलोच तुझ्या घरासमोरून कधी तर तुझ्या खिडकीकडे बघण्याची सवय अजूनही आहे.

रोज निरखतो बदलणारी चंद्रकोर आजही वाटतो फिका चंद्र तुझ्यासमोर. अशीच चंद्राशी तुझी तुलना करण्याची सवय अजूनही आहे.

माझा आणि देवाचा तसा छत्तीसचा आकडा आहे. पण गेलोच देवळात कधी तर तुझ्या त्या देवाकडे तुला मागण्याची सवय अजूनही आहे.

आता ही जागतो मी रात्रभर चांदण्यांनाही झोप नसते. क्षणभर मग आमच्या गप्पा रंगल्या की चांदण्यांना तुझ्या गोष्टीसांगण्याची सवय अजूनही आहे.

एकटा एकटा आता राहू लागलोय मी. दिवसाही तुझी स्वप्नं पाहू लागलोय मी.भंग ली पूर्वीची स्वप्नं सारी तरीही तुझ्या स्वप्नांत जगण्याची सवय अजूनही आहे.

नाकारलंस तु मला नेहमी ना जाणल्यास भावना कधी समजतील तुला त्या कधीतरी. होशील तु माझी तेव्हा तरी अशीच मनाची समजूत काढण्याची सवय अजूनही आहे.

का अशी बदललीस तु ? का माझ्यासाठी परकी झालीस तु ? खरंच का मला विसरलीस तु ?

मी आता तुझा कुणीही नसलो तरी तूला आपल म्हणन्यां ची सवय अजूनही आहे. अजूनही आहे.....
Previous Post Next Post