Sunday, November 24, 2013

प्रेम करणारी तू....

माझा SMS न वाचता, तो Delet करणारी तू.. माझा Call पाहता, तो Cut करणारी तू.. मी समोर दिसता, मला न पहिल्या सारखं करून पुढे निघून जाणारी तू.. अन पुढे गेल्यावर, हळूचं मागे वळून मला पाहणारी तू... आपल्या आपल्याचं मित्रांनमध्ये, मला विसरण्याचा प्रयत्न करणारी तू.. अन, कोणी माझ्या बद्दल काही विचारलं तर, फक्त गप्पा राहणारी तू.. माझी आठवण आल्यावर, चोरून रडणारी तू.. आणि, जगा समोर, गोड गोड हसणारी तू..रोज मला पाहून, न पहिल्या सारखा करणारी तू.. अन,माझ्या हातात सिगारेट पहिली कि, सिगारेट टाक खाली, आणि घरी जा, असं, फोन करून बजावणारी सुध्दा तूचं.. प्रेम असून हि, नाही असं भासवणारी तू.. अन , माझ्या वर जीवपाड प्रेम करणारी तू....
Reactions: