कोणी गेलं म्हणून

कोणी गेलं म्हणून, आयुष्य थांबवून ठेवायचं नसतं...
जगायचं असतं प्रत्येक क्षण, उगाच श्वासांना लांबवून ठेवायचं नसतं...
आठवणींच्या वाटांवरून  आपल्या स्वप्नापर्यंत पोहोचायचं असतं...
Photo
आभाळापर्यंत पोहोचता येत नसतं कधी,त्याला खाली खेचायचं असतं...
कसं ही असलं आयुष्य आपलं, आयुष्य थांबवून ठेवायचं नसतं...
दिवस तुझा नसेलही, रात्र तुझीच आहे. त्या रात्रीला नवीन स्वप्नं मागायचं असतं...
तुझ्याच वेड्या श्वासांकडे  थोडं जगणं मागायचं असतं...कोणी गेलं म्हणून..
Previous Post Next Post