इथे प्रत्येकाला आहे आपले दुःख  प्रत्येकाची एक वेगळी कहाणी ...
दुसऱ्य़ाचे दुःख कोण समजणार ? प्रत्येकाची आहेत आपली रडगाणी !

खूप भेटतात मित्र, सगे, सोयरे.. पण दुःखात सहभागी होणारे अगदी मोजके..
कधी कधी तर आपले जवळचेच वाटू लागतात जणू परके !अशा वेळी कोणी अनोळखीच जास्त जवळचा वाटू लागतो...
आपल्या मनातल्या जखमांवर जो हळूवार फुंकर घालतो !

वरवर बोलणारे अनेकजण भेटतात..पण असा एखादाच असतो ...
जो तुमच्या अंतर्मनाला स्पर्श करून जातो !तुमच्या हसऱ्य़ा मुखवट्यामागचा खरा चेहरा जो बघू शकतो

गूगल ऐडवर्ड्स

 
Top