Tuesday, November 26, 2013

ती आली आयुष्यात

ती आली आयुष्यात  मी बेभान झालो, कळले नाही कधी मी तिच्यात गुंतलो.,
जेव्हापासून तिच्या प्रेमात मी हरवून गेलो, कळले नाही कसा शब्दांशी खेळू लागलो.,
तिच्या प्रेमरंगात मी देहभान विसरलो, तिच्या प्रितीन पुरता मी झपाटला गेलो.,
वेगवेगळ्या भावनांना ती जन्म देते, माझ्या हातून सार ती लिहून घेते.,
 

माझी कविता म्हणजे तिचा न माझा संवाद असतो, मी फक्त तिच्यावर वेड्यासारखं प्रेम करतो.,
कवी नाही मी हे माझं प्रेम आहे, चार दोन कविता करून प्रेम थोडच थांबणार आहे.,
माझं प्रेम जगावेगळ ते कधीच मिटणार नाही, हे जग सोडेपर्यंत हि भावना मनातून जाणार नाही..
Reactions: