हे असच चालायचं हे असच चालायचं,

आम्ही तुमच्याकडं बघायचं तुम्ही आमच्याकड बघुन नबघितल्यासारखं करायच.

हे असच चालायचं हे असच चालायचं,
...

तुम्ही शिकण्यासाठी शाळेत जायचं आम्ही तुमच्यासाठी शाळेत जायचं शाळा सुटल्यावर तूम्ही घरी जायचं आम्ही तुमच्या पाठीपाठी जायचं.

दिवसभर आम्ही तुमच्या गल्ली-बोळातुन फिरायचं तुम्ही गच्चीत राहुन उगीच आमच्याकडं बघायचं.

हे असच चालायचं हे असच चालायचं,

अचानक तुमचं लग्न ठरायचं तूम्ही आम्हाला लग्नाला नाही बोलवायचं. तरिपण आम्ही लग्नाला यायचं कचकुन खायचं दचकुन रडायचं.

हे असच चालायचं हे असच चालायचं,

एके दिवशी तुम्हीसासरहुन माहेरी यायचं तुमच्याकडे कडेवर बाळ असायचं बाळ आमच्याकडे बघुन गुलुगुलू हसायचं, आणिबाळाला तुम्ही हळुच विचारायचं बाळा मामाकडं जायचं.
हे असच चालायचं हे असच चालायचं..गूगल ऐडवर्ड्स

 
Top