प्रेम कधीच आंधळ नव्हत कुणी दचकल तर कुणी उडाल असेल पण मी अनुभवान सांगतो प्रेम आंधळ नसतं अख्ख जग त्याला आंधळ म्हणत असत पण दिसत तसं नसतं प्रेम आंधळ नसतं कारण कुणीही उठसुठ प्रेमात पडत नसतं कुणाच्याही आयुष्यात प्रेम येत नसतं काहीतरी भावत मनास उगीच धावत नसतं काहीतरी दिसत वेगळ म्हणून वेड लागत असत कुणाच प्रेम होत सुंदर चेहऱ्यावर तर कुणी मरत त्याच्या मनावर कुणाला वेड लागत स्वभावाच न हुशारीच... तर कुणाला लागत चांगल्या वागण्याच म्हणजेच प्रेमाला काहीतरी दिसत उगीच मन कुणात थोडं फसतं मग जग कसं म्हणत प्रेम आंधळ असत आंधळ असत ते मनन त्यावरचा विश्वास तोविश्वास तुटल्यावर प्रेम आंधळ वाटत पण ते फक्त माणसाच्या कर्माचफलित असत मुळात जो घाव घालतो विश्वासावर त्याच्या मनातच प्रेम नसतं किंवा जो जातो प्रेमाला सोडून त्याला प्रेमच कळलेलं नसतं प्रेम म्हणजे स्वार्थ किंवा आकर्षण नसतं प्रेम म्हणजे मिळवण नव्हे तर देणं असत विश्वासान बांधलेलं ते सुंदर लेणं असत प्रेम वय जात धर्म काहीचपहात नसतं ते फक्त दुसऱ्या मनातल प्रेम पहात असत मनातल्या आरशात डोकावल्यावर आपलं प्रेम कळत पण ते न बघता मन नुसतच धावत सुटत प्रेम भोगात नाहीतर त्यागात आहे ज्याच्यावर प्रेम झालं त्याचच जगणं होऊन जात कुणी विचारच करत नाहीम्हणून तसं वाटत प्रेम सुंदरच असत प्रेम आंधळ नसतं कुणी प्रेमात पडलच तर ते तावून सुलाखून घ्याव प्रेमानच दोघांचही जगणं समृद्ध कराव...
प्रेम आंधळ नसतं
Hanumant Nalwade
0