Friday, October 18, 2013

होती एक मैत्रीण माझी


होती एक माझी मैत्रीण माझ्या कवितांवर प्रेम करणारी  माझ्या शब्दाना समजणारी
 होती एक मैत्रीण माझी मला रोज सकाळी मेसेज करणारी  पिल्लू , स्वीटहार्ट, चेतू म्हणून झोपेतून उठवणारी
...

होती एक मैत्रीण माझी मला समजून घेणारी  माझ्या डोळ्यातले दुःख सहजपणे वाचणारी

 होती एक मैत्रीण माझी माझ्यावर हक्काने रुसणारी  आणि मी फनी फेसेस केल्यावर माझ्यावर खुदु खुदु हसणारी

 होती एक मैत्रीण माझी माझ्या सोबत निर्धास्त चालणारी  बरसणाऱ्या पावसात माझी सोबतीन् बनणारी

ती एक मैत्रीण माझी गुड्डू न् क्युट दिसणारी  आनंद झाल्यावर मला घट्ट मिठीत घेणारी

Reactions: