ते ह्र्दय जणू चुकार होते

तीलाच द्याव मन हेच विचार होते तीच्या निशब्द ह्र्दयात नकार होते.

ती दोष देउन जरी नियतीस गेली माझे तिच्याहुन नशीब सुमार होते.

कर्जात बूडुन पुर्ण जगलो असाच आयुष्य जणु नुसतेच उधार होते.

तीला अर्थ समझला हसण्याचा जेव्हां आले गळुन नयनात तुषार होते.

अश्या अनेक ह्रदयात निवास तीचा माझेच ते ह्र्दय जणू चुकार होते.

काळोख तो सहज नशेत तोल गेला झाली सकाळ तर तेच गटार होते.

आता कुठे लपवु ओघळत्या अश्रुंना माझे अश्रुच गळण्यात हुशार होते.
Previous Post Next Post