अश्रू ते लोचनी लपवतेस कशाला ? सांग पापण्यांना फसवतेस कशाला ?
शब्द येता ओठी त्यास अडवतेस कशाला? मग चावून अधराना दुखावतेस कशाला?
येता विचार मनी, दडवतेस कशाला? देवूनी हुंदके मग रडतेस कशाला?
गर्दी भावनांची, तू झाकतेस कशाला भाव विभोर चेहर्याला , असली शिक्षा कशाला
कशा कशाला तू फसवशील, रडवशील, झाकशील आठवण येता त्याची राहवेल का त्या खळ्यांना
खुदकन हसून फोडतील सारे भांडे तुझे ...प्रेमच ते असे लपविता येत नाही हेच खरे...