Wednesday, September 25, 2013

अवघड जातोय

किती सहजच बोलते ती,
किती सहजच हसते ती,
आठवण आली तर
किती सहज सांगते ती.....

अशी का आहे ती "सहजच"....
किती सहज बोलते,
"विसरून जा मला!"

किती सहज बोलते
ती रागाऊनही बोलताना...
पण तिचा तो "सहजच"
मला जरा अवघड जातोय
"तिलाच" विसरताना....
Reactions: