Monday, September 23, 2013

एक दगडाच मन दे

आजवर काही मागीतल नाही  पण आज एक वर दे
हात जोडून मागतो देवा एक दगडाच मन दे . .।।

हजार वार होतात आज या काळजावर
जवचेच सोडून जातात अनोळखी वळनावर
नाती जशी तुच देतोस त्यांना थोड आयुष्य दे
हात जोडून मागतो देवा एक दगडाच मन दे . . ।।

आठवनी जवळ राहतात त्यांच्या आनखी काही नाही
सावली सारख्या पाटलाग करतात आनखी काही नाही
दिलास आता दुरावा तसेच सहनशीलतेच बळ दे
हात जोडून मागतो देवा एक दगडाच मन दे . . ।।

एकांताला आपल मानतो आता मला कोणीच नको
मीच स्वत:ची समजूत घालतो आता दुस~याला ञास नको
पण ज्यांनी दिल दु:ख मला त्यांना भर-भरुन सुख दे
हात जोडून मागतो देवा एक दगडाच मन दे . . ।।

ते दुर आहेत खुप माझ्या तरी का ही ओढ आहे ?
सुखात असतील माझ्यावीना हीच जानिव गोड आहे
त्यांच्या जीवनात आनंद आणि हवतर मला दु:ख दे
हात जोडून मागतो देवा एक दगडाच मन दे . . ।।
Reactions: