खरं कौशल्य असत

दुःखाला सामोरे जाण्यातच खरं कौशल्य असतं
त्यात जमिनीवर राहुनही आकाशात उडायच असतं,
आपल्या मनासारखं कधीच घडत नसतं
हीच माझी ओळख असं नशीब म्हणत असतं,
ऊन एकटं कधीच येत नाही ते सावलीला घेऊनच येतं,
फक्त सावलीला प्रकट व्हायला झाडाचं अस्तित्व
लागतं,
चांदण्याला महत्त्व अंधारामुळेच येतं दु:खाचं अन् सुखाचं
हेच नातं असतं
दु:खच नसेल आयुष्यात तर मजा घेता येईल का?
ओलं न होता कधीतरी पावसात भिजता येईल का.
Share on Google Plus

About Hanumant Nalwade