जवळच्या माणसांची यादीकधीच मोठी नसते. त्यात मोजकीच माणसं असतात. पण त्या मोजक्यामाणसाच्या मोजणीत आपण नसू तर? ओळख गरजेमुळेचहोते. कधी जाणण्याची ओढ असते, कधी संकटं, तर कधी एकटेपण. पण गरज नक्की असते. खरंतर आपण कधीच कुणाचीगरज असू नये. कारण गरज कधी ना कधीसंपतेच. "का संपलं हे सगळं?" हा प्रश्न जन्माला येतो. पण... काही प्रश्नाची उत्तरं ऐकणाऱ्यानेही द्यायचीच नसतात. कारण, काही प्रश्नाची उत्तरं विचारणाऱ्यालाही नकोअसतात. मिळालेलीकाहीउत्तरं समाधानापेक्षा त्रासच जास्त देतात. चित्रातले रंग पुसट होत जातात. समोरच्यापर्यंत आपले शब्द पोहोचणं, पण अर्थाने मात्र मागेच घुटमळत राहणं यातही एक मोठीघुसमट असते. यह दिल भी साला अजीब हें... सुख जुनं होतं. पण, दु:ख कधीच जुनं होत नाही. आपण ते होऊचदेत नाही.

गूगल ऐडवर्ड्स

 
Top