Tuesday, July 23, 2013

कधीच नाही पहाणार.

कसे सांगू तुला माझ्या मनीचीव्यथा तु नसताना झालीय माझी काय दशा...

कसे सांगू तुला माझे चुकले नव्हते नियतीपण कधी कधी सर्वांनाच झुकाविते...!

कसे सांगू तुला तीपरीक्षाच असेल कुणाचा किती विश्वास देव पाहत नसेल??...

कसे सांगू तुला प्रेम मिळविणे कठीण मिळालेच तर टिकविणे त्याहून हि कठीण...

कसे सांगू तुला तु कितीअनमोल हजारो जन्मात माझ्या चुकणार नाहीत मोल..

कसे सागु तुला मन किती उदास तु नाहीस तरी तुलाचपाहण्याची आस...

कसे सांगू तुला हृदय किती रडतेय तुझ्या हृदयाला विचार त्याला सर्व कळतेय...

कसे सांगू तुला श्वास आता थांबतोय हळू हळू आता अखेरचा होऊ पाहतोय..

कसे सांगू तुला जीव आता जातोय क्षणभराचा विलंब हा देह सोडू पाहतोय..

कसे सांगू तुला मीमीनाही राहणार तुझ्यावाचून माझे अस्तित्वच नाही उरणार...

कसे सांगू तुला काहीतरी बोल नाहीतर तु मला कधीच नाही पहाणार. कधीच नाही पहाणार.

Reactions: