प्रेम की मैत्री

थोडासा हलका फुलका पण तितकाच विचार करायला लावणारा.प्रश्न .. खूप वेळाएखाद्या नात्याची सुरवात सुंदर अशा मैत्रीने होते आणिनंतर त्याच मैत्रीच प्रेमात रुपांतर होत. हि गोष्ट जेव्हा एकतर्फी असते तेव्हाअशा नात्यामधून एक व्यक्ती हमखास दुखी होतेच होते. पण हीच घटना जेव्हा दुतर्फा होते तेव्हा एक मैत्रीपूर्ण प्रेम आपल्या आयुष्यात येत . खर तरप्रेमात मैत्रीसारखा भाव नात सुंदर फुलवत नेतो. मित्रांमध्ये असलेला मोकळेपणा जर प्रेमात आला तर ते प्रेम जास्त टिकाऊ होत हे मात्र खर.संशयापेक्षा विश्वास हा मैत्रीमध्ये जास्त असतो आणि प्रेमात तो स्वमित्वाकडे झुकत जातो. गैरसमजही तसे मैत्रीमध्ये कमी होतात पण प्रेमात छोटस कारणही पुरेस होत." वाटूनघेण (शेअर) हा मैत्रीचाआत्मातर आपल्यापुर्तच असाव असा प्रेमाचा अट्टाहास. अस कितीही असल तरी प्रेम ते प्रेमच असत. नात बदलल कि अपेक्षा बदलत जातात ...मैत्रीच्या नात्याने प्रेमाकडे बघण ही खूप कठीण गोष्ट होते...मग चालू होतो एक छोटासा हवाहवासा संघर्ष .. गैरसमजुतीने मैत्री तुटू शकते पण प्रेमात मात्र हि शक्यताफार कमी असते. अबोल हा मैत्रीमध्ये गाठ निर्माण करतो तर हाचअबोला प्रेमात एक सुखद हुरहूर..मैत्रीतअसलेल प्रेम आणिएखाद्या व्यक्तीवर केलेलं प्रेम ह्यात डाव उजव करण तस कठीणच पण तरीही ह्यादोन नात्यांनी आयुष्य परिपूर्ण बनत. विरहाची झळ तितकीच वेदना देणारी.जगण्याचाखरा अर्थ प्रेम शिकवत आणि कस जगाव हे मैत्री...नात्याच्याटिकावूपणा हा काळावर नाही तर भावनेवर अवलंबून असतो म्हणूनच काही क्षण सहवासाचे कायमची नाती निर्माण करून जातात मग तीमैत्री असोकिप्रेम...विषय खूप मोठा थोडक्या शब्दात न मांडता येणारा...

Previous Post Next Post