तुझ्या आठवणीने पुन्हा जळत...

तुझ्या आठवणीने पुन्हा जळते सुसाट वाहना~या वा~याला विचार माझ्या आर्त किंकाळ्या त्या नपचना~या वेदना शब्द शब्दातुनीऊधळलेल्या चारोळ्या

सोबत जगलेल्या क्षणांना बरसतांना, वाहतांना, सांडतांना किती वेळा पुन्हा पुन्हा पेरतो उगवीण्यासाठी जरी ते बोचतांना

फुलुन येतोमाझा निसर्ग डोळ्यात जगतो माझा स्वर्ग किती रुपांनी तु मज भेटतेस फुला फुलातुनी फुलतेस

एकटाकसाम्हणु मी स्वताःला क्षण अन क्षण तु असतेस सोबतीला तरी रात्र ही सुनीसुनी भासते तुझ्या भेटीच्या तीव्रतेत नव्याने सरते

काळजाची आग वाढत जाते दुर दुर आभाळभर पसरत जाते असंख्य लालबुंद ढगातुन कोसळतात वीजा सर्वत्र राख्र होते तुझ्या आठवणीने पुन्हा जळत...

तुझ्या आठवणीने पुन्हा जळत... तुझ्या आठवणीने पुन्हा जळत... Reviewed by Hanumant Nalwade on July 21, 2013 Rating: 5
Powered by Blogger.