एक छोटा मुलगा टेलिफोन बूथ वरून एक कॉल करतो, तेथील दुकानदार त्याचे फोनवरील बोलणे ऐकत असतो..... . मुलगा - ताई, तुमच्या घरासमोरील गवत कापायचे काम मला द्याल का? . फोनवरील ताई :- माझ्याकडे गवत कापणारा आहे..... . मुलगा - मी त्याच्या पेक्षा कमी पैशात गवत कापून देईन, मला काम द्या ना..... . फोनवरील ताई :- पण मीत्याच्या कामावर समाधानी आहे..... . मुलगा - ताई, मी गवत कापण्याबरोबर फरशी साफ करण्याचे काम पण करेन..... . फोनवरील ताई - नको, धन्यवाद.....(असं म्हणून त्या ताई फोन ठेवून देतात...) . तेथील दुकानदाराला त्याची दया येते, व तो म्हणतो तू आजपासून माझ्याकडे काम कर..... . मुलगा - नाही, नको.. धन्यवाद..... . दुकानदार - अरे आता तर तू कामासाठी एवढी विनवणी करत होतास मग आता काय झाले ? . मुलगा - नाही हो काका, त्या ताईंकडे गवत कापणारामीचं आहे, पण मी कसे काम करतो, ताई माझ्या कामावर समाधानी आहेत किनाही हे मला बघायचे होते..... . तात्पर्य :-प्रेम व मैत्री मध्ये दुसरा कितीचुकतो हे बघण्यापेक्षा स्वतः आपण किती चुकतो हे नेहमीबघत राहिल्यास, प्रेमाचं फुल कधीचं कोमजणार नाही.....
मुलगा
Hanumant Nalwade
0