आठवशील ना मला ?

मला फक्त तुझी मैत्रीच हवी होती सांग आठवतोय ना तुला ?

फिरताना घेतलेला हातात हात तुझा मोरपिशी मखमली परी अंगभर शहारलेला स्पर्शतुझा जेव्हा देशील तो हात हातात कुणाच्या क्षणभर शहारून .....

..... सांग आठवशील ना मला ? सांग आठवतोय ना तुला ? सोबत पाहिलेला तुटताना ताराकाहीतरी मागुया म्हणताना उजळून आलेला चेहरा तुझा जेव्हा तुटेल हे मन कुशीत कुणाच्या सौधात उभी राहून .....

..... सांग आठवशील ना मला ? सांग आठवतोय ना तुला ? कातरवेळी उगवलेला पुनवेचाचांदवा दूर राहिलो तरी नचुकता पहायचा हट्ट तुझा जेव्हा उगवेल पुन्हा सांजेला देशात कुणाच्या हलकेच कातरून .....

..... सांग आठवशील ना मला ? सांग आठवतोय ना तुला ? अवघड वळणावरचा वेडा बहाणा तू नको नको म्हणताना श्वासात मिसळलेला श्वास तुझा जेव्हा भासेल उग्र तोमिठीत कुणाच्या संकोचात गुदमरून .....

..... सांग आठवशील ना मला ? सांग आठवतोय ना तुला ? हरेक क्षण तो मंतरलेला तुजवर रचलेल्या कवितांमधून जिवंत केलेला आभास तुझा जेव्हा होईल हे शरीर अधीन कुणाच्या मन माझ्यात गुंतवून .....

..... सांग आठवशील ना मला ?

आठवशील ना मला ? आठवशील ना मला ? Reviewed by Hanumant Nalwade on July 21, 2013 Rating: 5
Powered by Blogger.