प्रेमाचं_हे_असच_असतंय

प्रेमाचं हे असच असतंय कुणालाही काही कळत नसतंय
जरी कळल सगळ्यांना कळतंय पण मनाला वळत नसतंय ,
प्रेमाचं हे असच असतंय सगळ काही माफ असतंय
जरी कळल सगळ माफ असतंय पण प्लानिंग मात्र पक्क असतंय ,
प्रेमाचं हे असच असतंय रोज झोप लागत नसतेय
जरी कळल झोप लागत नाहीयेय पण डोळे मिटायचं धाडस कोण करतंय ,
प्रेमाचं हे असच असतंय डोक्यात विचारांच काहूर माजतय
जरी कळल विचारांच काहूर माजतय पण तिचा विचार करायचं कोण सोडून देतय ,
प्रेमाचं हे असच असतंय सकाळी उठलो तरी पहिली तीच दिसतेय
जरी कळल रोज पहिली तीच दिसतेय पण तिला विसरुन कोण दिवस खराब करतय
प्रेमाचं हे असच असतंय सगळ काही माफ असतंय
पण प्लानिंग मात्र पक्क असतंय प्रेमाचं हे असच असतंय...........!
प्रेमाचं_हे_असच_असतंय प्रेमाचं_हे_असच_असतंय Reviewed by Hanumant Nalwade on June 05, 2013 Rating: 5
Powered by Blogger.